Breaking News

शरद पवार यांचा प्रभू रामचंद्रांना विरोध; भाजप नेत्या उमा भारती कडाडल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

शरद पवारांनी राम मंदिराबाबत केलेले वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील नाही, तर प्रभू रामचंद्रांविरोधातील आहे, अशी घणाघाती टीका भाजपच्या फायरब्रँड नेत्या उमा भारती यांनी केली आहे.

रामाचे मंदिर बांधून कोरोना निघून जाईल असे मोदी सरकारला वाटत आहे. त्यामुळे या मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख आणि इतर चर्चा होत आहेत. राम मंदिर बांधून कोरोना दूर जाणार असेल तर खुशाल भूमिपूजन करा, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात केले होते.

शरद पवार यांच्या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. भाजप नेत्या उमा भारती यांनी या वक्तव्याचा संदर्भ घेऊन शरद पवारांवर टीका केली. त्या म्हणाल्या, पवारांनी केलेले वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणारे नाही, तर थेट प्रभू रामचंद्रांना विरोध करणारे आहे. आम्ही हा विचार करीत आहोत की कोरोना दूर कसा निघून जाईल. अशात काही लोकांना वाटते की मंदिर न बांधल्याने कोरोना जाईल.

उद्धव ठाकरे गप्प का?; विनायक मेटे यांचा सवाल

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या उभारणीबाबत केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ’पवारांनी हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. स्वत:ला हिंदू नेते म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता गप्प का,’ असा सवालही मेटे यांनी केला आहे.

’मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, असे त्यांचे म्हणणे असेल तर मंदिर न बांधून तो जाणार आहे का,’ असा प्रश्न मेटे यांनी पवारांना केला. ’शरद पवारांनी हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अवमान केला आहे. स्वत:ला हिंदू नेते म्हणवणारे मुख्यमंत्री आता मूग गिळून गप्प का? त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी,’ असे आव्हानही मेटे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.

Check Also

अनुसूचित जाती मोर्चा संवाद मेळावा उत्साहात

सरकार मागासवर्गीय समाजासोबत -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब …

Leave a Reply