Breaking News

रोहा 26 गाव योजनेतील पाणीपुरवठा खंडित; महिलांचे हाल

रोहे ः प्रतिनिधी

तालुक्यातील 26 गाव पाणीपुरवठा योजनेतून  लाभार्थी गावांना पाणी मिळत नसल्याने तेथील महिलांची पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या योजनेतील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी  होत असून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनचे हत्यार उपसणार असल्याचे बोलले जात आहे.  रोहा तालुक्यातील पडम, खारापटी, निडी, कोपरा, भातसई, झोळांबे, लक्ष्मीनगर, शेणवई, डोंगरी, शेणवई आदीवाशीवाडी, वावेखार, वावे पोटगे, यशवंतखार, सानेगाव, दापोली, कोपरी, करंजवीरा धोंडखार आदी गावांसाठी एमआयडीसीने 26 गाव नळपाणीपुरवठा योजना उभारली आहे. या योजनेतून सुरुवातीला पडम ते शेवटच्या गावापर्यंत पाणीपुरवठा होत होता, मात्र या योजनेच्या जलवाहिनीवरून अनेक अनाधिकृत नळ जोडण्या झाल्याने लाभार्थी गावांना आता पाणीपुरवठा होत नाही. या योजनेंतर्गत येणार्‍या गावातील लोकांनी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी तहसीलदार, प्रांताधिकारी, एमआयडीसी, जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात कित्येकदा निवेदने, अर्ज देत बैठकासुध्दा घेतल्या, मात्र कोणतीच कारवाई झाली नाही. दरवर्षाप्रमाणे या गावांना यंदाही पाणीपुरवठा होत नसल्याने तेथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. महिलांना विहीर अथवा अन्य स्त्रोताच्या माध्यमातून पाणी गोळा करावे लागत आहे. दरम्यान, या योजनेतून येत्या 13 तारखेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पडम येथे उपोषणास बसण्याचा इशारा निडी तर्फे अष्टमी येथील ग्रामपंचायत सदस्य अजित पोकळे यांनी असतानाही त्याबाबत कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. एप्रिलनंतर मे व पुढे पावसाळा सुरू होईपर्यंत या भागात पाणी टंचाईची समस्या वाढणार आहे. त्यामुळे या विभागातील ग्रामस्थ तीव्र आंदोलन करण्याच्या भुमिकेवर पोहचले आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply