Breaking News

कोवॅक्सीनच्या मानवी चाचणीला ‘एम्स’मध्ये सुरुवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतात बनविण्यात येणारी कोरोना विषाणूवरील लस अर्थात कोवॅक्सीनची मानवी चाचणी घेण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालय सज्ज झाले आहे. मानवी चाचणीची मुख्य जबाबदारी सांभाळणारे डॉ. संजय राय यांनी ऑल इंडिया रेडिओला या संदर्भातील माहिती दिली.

डॉ. राय म्हणाले की, कोवॅक्सिन या लसीची एम्स रुग्णालयात मानवी चाचणी करण्यासाठी स्वयंसेवकांची नावनोंदणी सुरू आहे. देशातील 12 ठिकाणी मानवी चाचणी होणार आहे. त्यात दिल्लीतील एम्स रुग्णालयाचाही समावेश आहे. इतर चाचणी केंद्रांपेक्षाही एम्समध्ये सॅम्पल साइज (मानवी चाचणी करण्यात येणार्‍या स्वयंसेवकांची संख्या) अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणच्या चाचणीचा प्रयोग दिशादर्शक ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात 375 जणांवर या लसीचा प्रयोग केला जाणार आहे. यापैकी 100 जण एआयआयएसएसमधील असतील. 18 ते 55 वयोगटातील व्यक्तींवर ही चाचणी केली जाणार आहे. चाचणीसाठी तयार झालेल्या उमेदवारांना या लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर 14 दिवसांनी पुढचा डोस देण्यात येणार आहे. हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल-3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कन्टेन्मेंट फॅसिलिटीमध्ये ही लस विकसित करण्यात आली. कोरोनावरील आजारावर तयार करण्यात आलेली पूर्ण भारतीय बनावटीची ही पहिली लस कोवॅक्सीन 15 ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply