उरण ः प्रतिनिधी
फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड व्हाइस एडमिरल अजित कुमार यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 21) पश्चिम नौदल कमांडच्या पहिल्या दोन मेगावॅट (2चथ) कॅपॅसिटी सौरऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. नेव्हल स्टेशन करंजा येथे हा प्रकल्प स्थापित करण्यात आला आहे.
तो या प्रदेशातील सर्वांत मोठ्या सौर सयंत्रांपैकी एक आहे. सोलर प्लांटमध्ये 100 टक्के स्वदेशी विकसित सौर पॅनेल, ट्रॅकिंग टेबल्स आणि इन्व्हर्टर आहेत. कॉम्प्युटराइज्ड मॉनिटरिंग व कंट्रोलसह सिंगल अॅक्सिस सन ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून हा ग्रीड एकमेकांशी जोडलेला आहे. हा प्रकल्प नौदल स्थानकाच्या वीजपुरवठा गरजा पूर्ण करण्यासाठी सौरऊर्जेसाठी आणि अक्षय ऊर्जेचा वापर करण्याच्या दिशेने भारतीय नौदलाचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.