Breaking News

जी. पी. पारसिक सहकारी बँकेचे माजी चेअरमन जयराम पाटील यांचे निधन

ठाणे ः प्रतिनिधी

जी. पी. पारसिक सहकारी बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक जयराम पाटील (79) यांचे कोरोनाच्या प्रादुर्भावाने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात  पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.

जयराम पाटील हे खारीगावमधील पहिले मॅट्रिक पास होते. कळवे ग्रामपंचायतीचे ते 11 वर्षे उपसरपंच होते. जी. पी. पारसिक बँकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत ते संचालक राहिले आहेत. दोन वेळा चेअरमन होण्याचा मानसुद्धा त्यांना मिळाला होता. जय भारत स्पोर्ट्स क्लबचे ते संस्थापक होते. ज्येष्ठ नेते दशरथ पाटील आणि नगरसेवक उमेश पाटील यांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत. प्रसिद्ध व्यावसायिक जगदिश पाटील यांचे ते वडील आहेत. त्यांच्या निधनाने कळवा, खारीगावमध्ये शोककळा पसरली आहे. जयराम पाटील यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक ज्येष्ठ विचारवंत व संघटक आपल्यातून हरपले आहेत, अशा शब्दांत अखिल आगरी समाज परिषदेचे सरचिटणीस दीपक म्हात्रे व कार्याध्यक्ष जे. डी. तांडेल यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. शेतकरी नेते व आगरी परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर भोईर यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply