Breaking News

सेरेनाची माघार; फेडररची आगेकूच

मियामी : वृत्तसंस्था

सेरेना विल्यम्स हिने पायाच्या घोट्याच्या दुखापतीमुळे मियामी खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली असून, महिलांमध्ये अग्रमानांकित टेनिसपटू नाओमी ओसाका हिला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे; तर पुरुषांमध्येही अलेक्झांडर झ्वेरेव्हचे आव्हान संपुष्टात आले असून, रॉजर फेडररने विजयी घोडदौड कायम राखत आगेकूच केली आहे.

सेरेनाने रिबेका पीटरसनला 6-3, 1-6, 6-1 असे पराभूत केल्यानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे तिचे चाहते निराश झाले आहेत. सेरेनाच्या माघारीमुळे पुढील फेरीतील प्रतिस्पर्धी क्विआंग वॅँग ही आता थेट चौथ्या फेरीत दाखल झाली आहे.

जपानच्या ओसाकाला तैवानच्या सिएह सू वेईने 4-6, 7-6, 6-3 असे पराभूत केले. ओसाका बाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला, तसेच पुढील आठवड्यात जाहीर होणार्‍या क्रमवारीवरही या निकालाचा परिणाम दिसून येणार आहे.

दुसरीकडे पुरुषांमध्ये फेडररने राडू अल्बोटवर 4-6, 7-5, 6-3 असा विजय मिळवला; तर झ्वेरेव्हला डेव्हिड फेररकडून 2-6, 7-5, 6-3 असा पराभव पत्करावा लागला.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply