Breaking News

उरणमधील पुरातन श्रीगणेश मंदिर

उरण : वार्ताहर

उरण शहरातील गणपती चौक येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्री गणपती मंदिर हे सर्व गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर सुमारे 250 वर्षे पुरातन असून मंदिराच्या प्रवेशद्वारी आणि गाभार्‍यामध्ये पुरातन लाकडाच्या कोरीव कामाचा सुंदर नमुना आहे. मंदिरातील सुंदर सुबक आणि कोरीव काळ्या पाषाणातून घडवलेली रिद्धी-सिद्धीसह असलेली श्रीगणेशाची मूर्ती म्हणजे उत्कृष्ट कलेचा नमुना आहे. मूर्तीचे सुंदर लोभस रूप पाहून भक्तांचे हात अपोआप जोडले जातात. मंदिरात अष्टविनायकांच्या मूर्तींची  स्थापना करण्यात आलेली आहे.

या गणेशाचा जन्मोत्सव माघी गणेश चतुर्थीला साजरा केला जातो, तसेच भाद्रपद चतुर्थी आणि दीपावली उत्सवही साजरे केले जातात. भाद्रपद चतुर्थीपासून भक्तांची दर्शनासाठी गर्दी होत असते. हे गणेश मंदिर उरण आणि आसपासच्या परिसरातील गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. उरण बाजारात आलेले भक्त हे गणपतीचे दर्शन घेऊनच बाजारात जातात. रोज सकाळी व सायंकाळी 7.30 वाजता गणपतीची आरती केली जाते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply