Breaking News

जसप्रीत बुमराहला दुखापत

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्यामुळे त्याच्या वर्ल्डकप खेळण्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, पण सामन्यानंतर बुमराह दुखापतीतून सावरल्याची माहिती संघाकडून देण्यात आली.

सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या वतीने सांगण्यात आले की, क्षेत्ररक्षण करताना जसप्रीत बुमराहच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती, पण तो त्यातुन सावरत आहे. त्याच्या तंदुरूस्तीची चाचणी केली जाईल व याबाबत पुढील माहिती लवकरच देण्यात येईल.

बुमराहची दुखापत भारतीय संघाच्या वर्ल्ड कप मोहिमेलाही धोका पोहचवू शकते. अवघ्या दोन महिन्यांवर ही स्पर्धा आली आहे. बुमराहच्या दुखापतीची चाचणी होऊन वैद्यकीय अहवाल येईपर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि संघ व्यवस्थापनात चिंतेचे वातावरण आहे.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply