Breaking News

रायगडातील सहा नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी वाटाघाटी सुरू

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक 10  फेब्रुवारी रोजी होत आहे. त्याससाठी मित्र पक्षांशी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू केले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवार (दि. 4) पासून सुरूवात होईल. उमेदवारांची अंतिम यादी 9 फेब्रुवारी रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे 9 तारखेपर्यंत लढतींचे चित्र स्पष्ट झालेले असेल. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, म्हसळा, माणगाव, तळा, पाली व खालापूर या सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या नगरसेवकांमधून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडून द्यायचे आहेत. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक 10 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे या पदासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरू केली आहे. नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. खालापूर, पोलादपूर, तळा  नगरपंचायतींचे  नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव  झाले आहे. माणगाव, म्हसळा, पाली नगरपंचायतीचे  नगराध्यक्षपद खुले आहे. नगराध्यक्ष कोण असेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अनेक इच्छुकांनी आपली इच्छा प्रकट केली नसली तरी त्यांचीही चाचपणी सुरू आहे. नगराध्यक्षपद अडीच वर्षांसाठी असून काही ठिकाणी सव्वा सव्वा वर्ष अशी विभागणी करून गटबाजी आणि नाराजी टाळण्याचा प्रयत्न केला जाण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरूवात होईल. उमेदवारांची अंतिम यादी 8 फेब्रुवारी रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे 9  तारखेपर्यंत लढतींचे चित्र स्पष्ट झालेले असेल. 10 तारखेला निवडणूक होईल.  तोपर्यंत सर्वांचीच उत्सुकता ताणली गेलेली असेल.

 

नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण

सर्व साधारण महिला : तळा, पोलादपूर, खालापूर

सर्वसाधारण खुला (महिला किंवा पुरुष) : माणगाव, म्हसळा, पाली

असे आहे पक्षीय बलाबल

नगरपंचायत    शिवसेना    भाजप    राष्ट्रवादी      काँग्रेस    शेकाप

तळा             4         3        10           0         0

माणगाव          7        1        7            1         1

पोलादपूर        10       1        0            6          0

म्हसळा          2         0        13           2         0

खालापूर         8         0        2            0         7

पाली            4         0        6            0         4

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply