पनवेल : वार्ताहर
एका महिलेचे अश्लील फोटो काढून फोनवरून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे बोलून तिला धमकावणार्या एका इसमास पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे.डेरवली येेथे एका महिलेचे चोरून अश्लील फोटो काढून त्यानंतर तिला धमकावून व मनात लज्जा उत्पन्न होईल असे फोनवरून बोलणार्या इसमाबाबत संबंधित महिलेने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली शाहनवाज आलम (31) याला अटक करण्यात आली आहे.