पनवेल : बातमीदार
व्यवसायाकरिता घेतलेले 2 लाख रुपये परत न केल्या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती चिंतू भोपी (नावडे) यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून आरोपी यांचा गारमेंटचा व्यवसाय आहे. आरोपी नेहा सुदेश शिंदे व सुदेश शिंदे यांनी व्यवसायाकरीता 2 लाख रुपये घेतले होते. सदरची रक्कम 8 दिवसात परत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आरोपीने ही रक्कम परत केलेली नाही. त्यामुळे भोपी यांनी न्यायालयात फौ. चौ. अर्ज क्र. 1006/2018 अन्वये अर्ज दाखल केला होता. त्यानुसार तळोजा पोलिसांनी आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
-वीजचोरी उघडकीस, गुन्हा दाखल
उरण येथील डोंगरी गावात थकबाकीदार ग्राहकांचे वीज बिल वसुली मोहीमेत कार्यरत असताना महावितरणला प्रभाकर काशिनाथ घरत (वीजग्राहक) व संजय प्रभाकर घरत (वापरकर्ते ) यांच्या घरी विज चोरी असल्याचे आढळुन आले. घराच्या मीटरची तपासणी केली असता बेकायदेशीरपणे आउटगोइंग टर्मिनलमध्ये टाकुन मीटर बायपास करुन वीज चोरी करीत असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे महावितरण कडून ग्राहकाला वीज चोरी बाबत 1 लाख 66 हजार 740 रुपयांचे दंड रकमेचे वीज बील देण्यात आले. मात्र गाहकाने हे वीज बिल घेण्यास नकार दिल्याने व दंड न भरल्यामुळे विदयुत कायदा 2003 च्या कलम 135 नुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.