ऐरोली येथे निरंकारी भक्तांचे रक्तदान
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, साठे नगर, ठाणे बेलापूर रोड, दिघा, ऐरोली, नवी मुंबई येथे रविवार, दिनांक 24 मार्च, 2019 रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 86 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. रक्त संकलनाचे कार्य संत निरंकारी रक्तपेढी ,मुंबई द्वारे करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाच्या मुंबई क्षेत्राचे क्षेत्रीय प्रभारी श्री. भुपेन्द्र सिंह चुग यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यांनी रक्तदात्यांचे त्यांच्या कार्याबदृदल कौतुक करुन त्यांना प्रोत्साहित केले. उद्घाटन प्रसंगी श्री. मनोहर सावंत, श्री. अनिल शिंदे, श्री. सोमनाथ माने, श्री. राजाराम कांबळे आणि मंडळाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या ‘थॅलॅसेमिया मायनर’ चिकित्सा शिबीराचा सुध्दा 60 भाविकांनी लाभ घेतला. सदर शिबीराचे आयोजन करण्यासाठी स्थानिक सेवादल सदस्य आणि भाविकांनी महत्वपूर्ण योगदान दिले.