Breaking News

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे धाडसत्र; 75 लाखांचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त

तुर्भे : रामप्रहर वृत्त

तुर्भे एमआयडीसी येथून गुन्हे शाखा पोलिसांनी 73 लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तेथील गोदामावर अवैधरीत्या साठवण्यात आला होता. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, गोदाम मालकाचा पोलीस शोध घेत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. शहरात गस्त वाढविण्यात आली असून याआधीही कोपरखैरणे, पनवेल परिसरातून देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. तुर्भे एमआयडीसी येथील साईनाथ ग्रेनाइट या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी मद्यसाठा असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त अजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती शाखेचे वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या पथकाने शनिवारी रात्री त्या ठिकाणी छापा टाकला. या वेळी गोदामाच्या एका भागामध्ये बॉक्समध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या. त्यापैकी काही बॉक्स पोलिसांनी तपासले असता, त्यामध्ये महागडी दारू आढळली. पोलिसांनी केलेल्या मूल्यमापनामध्ये या दारूसाठ्याची किंमत 73 लाख 62 हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले. विदेशी मद्यसाठ्याबाबत पोलिसांनी गोदाम सांभाळणार्‍या कर्मचार्‍याकडे चौकशी केली असता, त्याने कस्टमच्या लिलावात हे मद्य खरेदी केल्याचे सांगितले. त्याबाबत पोलिसांनी कागदपत्रांची विचारणा केली असता, त्याची पूर्तता होऊ शकली नाही. यानुसार गोदाम मालक आशिष सिंग व कर्मचारी किसन कामकर यांच्याविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी कामकर यास अटक करण्यात आली असून, मालक सिंग याचा पोलीस शोध घेत आहेत. आचारसंहितेच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या विदेशी मद्यसाठ्याचा निवडणुकीशी संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Check Also

हम दिल दे चुके सनम @ 25

उत्कंठामय गोष्ट, देखणं सादरीकरण समीर (सलमान खान) भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या कलेतील निष्णात पंडित …

Leave a Reply