Breaking News

आम्ही मागून वार करत नाही

शेकापचे जयंत पाटील यांनी सुनील तटकरेंना सुनावले

अलिबाग : प्रतिनिधी
काही लोक असे आहेत जे मागून वार करतात. आम्ही जे काही असेल ते समोरासमोर करतो. आमचा पक्ष महाविकास आघाडीत आहे, असा सूचक इशारा शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांना दिला आहे. शेकापचा 73वा वर्धापन दिन रविवारी (दि. 2) अलिबाग येथील शेतकरी भवनात आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मुंबईमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्याशी संपर्क साधला होता असे सांगून, जयंत पाटील यांनी आपण महाविकास आघाडीतील पक्षांच्या प्रमुखांशी थेट बोलतो, असे सुनील तटकरे यांचे नाव न घेता म्हटलेे.  
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. पुढील निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला. यात शेकापचा उल्लेख नव्हता. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, आम्ही सत्तेत
नसलो तरी महाविकास आघाडीत आहोत. निवडणुका अजून दूर आहेत. निवडणुका येतील तेव्हा पाहू, असे म्हणत आमदार जयंत पाटील यांनी यावर भाष्य करणे टाळले.

Check Also

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply