सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी (दि. 30) निधन झाले. त्यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून 11 वेळा प्रतिनिधित्व केले होते. सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. ते आबा या नावाने ओळखले जात असत. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सांभाळले तसेच त्यानंतर मंत्रिपदही भूषविले होते. साधी राहणीमुळे आबा लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे.
Check Also
मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …