नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेले भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने गेल्या 10 महिन्यांपासून संघातील प्रमुख करारबद्ध खेळाडूंना मानधन दिले नसल्याची बाब समोर आली आहे. स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळणार्या खेळाडूंनाही गेल्या काही महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही.
भारताचे 27 खेळाडू बीसीसीआयच्या विविध करारश्रेणींमध्ये मोडले जातात. या सर्व खेळाडूंना गेल्या ऑक्टोबरपासून त्यांचे मानधनच मिळालेले नाही. इतकच नव्हे तर डिसेंबर 2019पासून भारतीय संघाने खेळलेल्या दोन कसोटी, नऊ वन-डे आणि आठ टी-20 सामन्यांची फीदेखील बीसीसीआयने अद्याप दिलेली नसल्याची बाब उजेडात आली आहे.
2019 डिसेंबरपासून बीसीसीआयमध्ये चिफ फायनाशियल ऑफिसर, तसेच गेल्या महिन्यापासून चिफ एक्झिक्यूटीव्ह ऑफिसर अॅण्ड जनरल मॅनेजर अशी पदे रिक्त आहेत. प्रशासकीय कामांसाठी महत्त्वाच्या पदावर माणसे नसल्याने खेळाडूंना मानधन देण्यास उशीर होत असल्याचे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …