Breaking News

…यापेक्षा मोठा लोकशाहीचा अपमान नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशाने निवडणूक हरली असे म्हणणे यापेक्षा मोठा लोकशाहीचा अपमान असू शकत नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 26) काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला राज्यसभेत उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी त्यांनी 2019ची निवडणूक देशाच्या जनतेने लढली असेही म्हटले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात एक नवा आजार सुरू आहे. ईव्हीएमसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कधी काळी आमची संख्या दोन होती, पण आमचा देशातील जनतेवर विश्वास होता. कष्ट करण्याची तयारी होती. विश्वासाने आम्ही पुन्हा पक्ष उभा केला. हीच आपल्या नेतृत्वाची कसोटी असते. त्या वेळी आम्ही रडत बसलो नाही. आम्ही प्रयत्न केले, मात्र जेव्हा स्वत:वर विश्वास नसतो तेव्हा कारणे सांगितली जातात. चुका स्वीकारण्याची तयारी नसणारे ईव्हीएमला दोष देत फिरतात, अशी टीका मोदींनी केली.

ईव्हीएमबाबत स्पष्टता आली तेव्हा आम्हीही त्याचा स्वीकार केला असे सांगताना काँग्रेसनेच ईव्हीएमसंबंधी नियम तयार केले. आम्ही सगळे केले म्हणणार्‍यांनी हेच केले आहे, असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला. तुम्ही विजय पचवू शकला नाहीत आणि पराभवही स्वीकारत नाही आहात. अहंकाराची एक मर्यादा असते, असा टोला त्यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वेळी पुन्हा एकदा एक देश एक निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला. प्रत्येक प्रयत्नाचे कौतुक केले पाहिजे. चर्चा तरी करावी असे आवाहन करून दरवाजे बंद केल्याने चर्चा होत नाही, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply