पनवेल : रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 4) 212 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 355 रुग्ण बरे झाले आहेत.
पनवेल तालुक्यात 122, खालापूर 21, अलिबाग 18, उरण 11, कर्जत, पेण, रोहा प्रत्येकी आठ, माणगाव सात, महाड चार, तळा व श्रीवर्धन प्रत्येकी दोन आणि सुधागड तालुक्यात एक पॉझिटिव्ह आढळला, तर मृत रुग्ण पनवेल तीन आणि खालापूर, रोहा व महाड प्रत्येकी एक असे आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 16,541 आणि मृतांची संख्या 447 झाली आहे. 12,929 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने 3165 विद्यमान रुग्ण आहेत.