Breaking News

नागपुरात नितीन गडकरींचे शक्तिप्रदर्शन

मुंबई : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी विविध जागांवर जवळपास सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे उमेदवारही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याच्या सोमवारच्या (दि. 25) शेवटच्या दिवशी दिग्गज उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे अर्ज दाखल केला. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.

नागपूरचे ’विकास पुरुष’ म्हणून ओळखले जाणारे नितीन गडकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना नेते आणि रामटेकचे उमेदवार कृपाल तुमाने हेही उपस्थित होते.

दरम्यान, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात आपले अर्ज दाखल केले. लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात येथे मतदान होणार आहे. या दोघांसमोर भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांचे तगडे आव्हान आहे. याशिवाय भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी बीडमध्ये, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांडेडमध्ये आणि माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply