Breaking News

बांधपाडा ग्रामपंचायतीमध्ये ‘कमळ’ फुलले

जेएनपीटी, उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

उरण तालुक्यात भाजपची घोडदौड सुरूच असून, सोनारीपाठोपाठ महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या बांधपाडा (खोपटे) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवार विशाखा प्रशांत ठाकूर यांनी तिरंगी झालेल्या लढतीत सर्वाधिक मते मिळवून बांधपाडा ग्रामपंचायतीवर स्वबळावर ‘कमळ’ फुलविले आहे. 11 सदस्यपदांसाठी प्रभाग क्रमांक 1 ते 4मधून भाजपचे

तीन, शिवसेनेचे चार आणि शेकाप-काँग्रेस आघाडीचे चार असे उमेदवार निवडून आले आहेत.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बांधपाडा (खोपटे) ग्रामपंचायतीवर एकहाती झेंडा फडकवला. नुकत्याच झालेल्या सोनारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही भाजप युतीने वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यामुळे सध्या उरण तालुक्यात भाजपचा बोलबाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. विजयी उमेदवारांचे भाजप नेते महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply