म्हसळा : प्रातिनिधी
दिवाळीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या रोहा शाखेतर्फे शनिवारी (दि. 29) मुरूड तालुक्यातील वाळवटी आदिवासीवाडीमध्ये भाऊबीज ओवाळणी कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी 33 आदिवासी महिलांना नविन साड्यांचे वाटप करण्यात आले. जनकल्याण समितीची पुर्वा पाळंदे हिने कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. ज्येष्ठ संघ कार्यकर्ते अविनाश दाते यांनी सांघिक गीत म्हटले. जनकल्याण समितीचे उदय जोशी यांनी दिवाळी आणि भाऊबीजेचे महत्त्व सांगितले. या वेळी वाळवटीवाडीमधील महिलांना नविन साड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच जयेश छेडा यांच्यातर्फे देण्यात आलेल्या ब्लँकेट्सचेही वाटप करण्यात आले. उपस्थितांना दिवाळीचा फराळ देण्यात आला. त्याचा सर्वांनी आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. वाळवटी आदिवासीवाडीमधील प्रमुख किरण जाधव, अंशकालीन आरोग्य रक्षक केशव जाधव, जनकल्याण समितीचे श्रीपाद गिरधर, श्रीपाद पाळंदे, श्रुती पाळंदे, यांच्यासह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.