Breaking News

चिंध्रणच्या उपसरपंचपदी भाजपचे नरेश सोनावणे

पनवेल : रामप्रहर वृत्त

तालुक्यातील चिंध्रण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे नरेश पोशा सोनावणे यांची निरोध निवड झाली आहे. त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष एकनाथ देशेकर, विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, सरपंच कमला देशेकर, सदस्य तुषार दुर्गे, कराडे खुर्दचे सरपंच भारती हेमंत चितळे,  माजी सरपंच विजय मुरकुटे, सदस्य योगेश मुरकुटे, भाजप कार्यकर्ता रजेश सोनावळे, प.ता.भीम शक्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड, प.ता.भारिपचे अध्यक्ष दीपक कांबळे, मोहन गायकवाड, गणपत कडू, शंकर देशेकर, इंद्राबाई पाटील, मंदा देशेकर, चंद्राबाई कडू तसेच भगवान कडू, महादेव गडगे, एकनाथ मुंबईकर, नामदेव पाटील, अनंता कडू, बाळाराम कडू, दिनेश पाडेकर, रवींद्र पाटील-कोंडले, चंद्रकांत देशेकर, एकनाथ पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, विश्वजित पाटील, शुभ पाटील, दिनेश खानावकर, तुषार दुर्गे आदी उपस्थित होते. सर्वांनी सोनावणे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply