Breaking News

पनवेल तालुक्यात 247 नवे कोरोना रुग्ण

आठ जणांचा मृत्यू; 171 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 9) कोरोनाचे 247 नवीन रुग्ण आढळले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 171 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 206 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 140 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 41 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 31 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात खारघर सेक्टर 12 प्रियदर्शनी सोसायटी, सेक्टर 10 कोपरागाव, पनवेल कोणार्क हेरिटेज, श्री लक्ष्मी अपार्टमेंट, कळंबोली, तळोजा फेज-1 हरितारा निवास, खांदा कॉलनी रो हाऊस सेक्टर 7 आणि सेक्टर 9 जेसल एम्पायर येथी व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महापालिका हद्दीत रविवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 26, कामोठेमध्ये 44, खारघरमध्ये 41, नवीन पनवेलमध्ये 54, पनवेलमध्ये 22, तळोजामध्ये 19 असा समावेश आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 8079 रुग्ण झाले असून 6334  रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.40 टक्के आहे. 1555 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 190 जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये उलवे 12, वारदोली चार, सुकापूर तीन, आपटे तीन, आकूर्ली,  केळवणे, देवद प्रत्येकी दोन, चिपळे, चावंडोली,  देवळोली सावळे, पळस्पे, नांदगाव, मोहो, कोप्रोली, उसर्ली खुर्द, तुराडे, करंजाडे, विचुंबे आणि आदई येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्हची संख्या 2440 झाली असून 2028  जणांनी कोरोनावर मात केली असून 49 जणांचा मृत्यू झाला आहे.

उरण तालुक्यात 14 जणांना लागण

उरण : उरण तालुक्यात रविवारी कोरोना पॉझिटिव्ह 14 रुग्ण आढळले, दोन रुग्णांचा मृत्यु व पाच रुग्ण बरे झाले आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये मराठी शाळेजवळ दादरपाडा वेश्वी, जासई शंकर मंदिर जवळ, मोरा सिव्हील पार्क मोरा रोड , मराठी शाळेजवळ जासई, कोप्रोली, करंजा नवापाडा, डाऊरनगर, मोरा कोळीवाडा, बालई उरण, सोनारी गावं साईबाबा मंदिरजवळ, बोकडवीरा द्रोणागिरी, बोकडविरा, एसीपी पोर्ट न्हावा शेवा पोलीस स्टेशन उरण, गोकुळधाम करंजा रोड उरण येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. बोकडवीरा द्रोणागिरी व गोकुळधाम करंजा रोड उरण येथील दोघांचा मृत्यू झाला आहे.

कर्जतमध्ये पाच नवीन पॉझिटिव्ह

कर्जत : कर्जतमध्ये रविवारी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचरिकेसह पाच जणांना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 598 झाली असून 503 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आढळलेल्या रुग्णांत कर्जतमध्ये दोन, तसेच शेलु, उकु्रळ, दहिवली येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

महाडमध्ये कोरोनाचे 11 नवे रुग्ण

महाड : महाडमध्ये रविवारी कोरोनाचे नवे 11 रुग्ण आढळले असून, पाच जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये देशमुख नर्सिंगहोम शेजारी दोन, मेहता एन्टरप्रायजेस जुनी पेठ दोन, किंजळघर, पिंपळदरी, नांगलवाडी एसबीआय समोर, धनलक्ष्मी अपार्टमेंट, दस्तुरीनाका, गणेशनगर बिरवाडी, उंदेरी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर चंदेरी येथे एकावा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत आणखी 332 रुग्णांची नोंद

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईत रविवारी 332 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर 213 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे नवी मुंबईतील  कोरोना बधितांची एकूण संख्या  18 हजार 481 तर बरे झालेल्यांची 14 हजार 286  झाली आहे.  रविवारी आठ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 469 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांची विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 46, नेरुळ 78,  वाशी 19, तुर्भे 23, कोपरखैरणे 60, घणसोली 45, ऐरोली 54, दिघा 7 यांचा समावेश आहे.

रोहे तालुक्यात 16 नवे बाधित

रोहे : रोहा तालुक्यात रविवारी 16 कोरोना बाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यामुळे रोहा तालुक्याची कोरोना रुग्णांची संख्या 771 वर पोहोचली आहे. दिवसभरात 12 जण बरे झाले आहेत. त्यामुळे तालुक्यात कोरोनावर मात करणार्‍यांची संख्या 508 वर पोहोचली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये दोन शहरात व ग्रामीण भागांमध्ये 14 व्यक्ती सापडल्या आहेत. त्यामध्ये नऊ स्त्रियांचा व सात पुरुषांचा समावेश आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply