नवी मुंबई : बातमीदार
रेसिडेंट असोसिएशनकडून निसर्ग वाढवण्यासाठी धडपडणार्या या संस्थेने निसर्ग वाचवण्यासाठी पारसिक हिलवर केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत असेच म्हणावे लागेल. त्यानुसार काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात उन्मळून पडलेल्या वृक्षांचे क्रेनच्या साहाय्याने पुनररोपण करत नवी मुंबईसमोर आदर्श निर्माण केला आहे.
गेल्या काही दिवसांत झालेल्या धुवादार पावसात नवी मुंबईतील पारसिक हिलवर देखील अनेक झाडे उन्मळून पडली. 10 ते 15 वर्ष झालेले वृक्ष या पावसात व सोसाट्याच्या वार्यात उध्वस्त व जमीनदोस्त झाले. या घटनेने सर्व सदस्य हळहळले. काहीही कसरून झाडे जगवली पाहिजेत या उद्देशाने झाडांचे पुररोपण करण्याचा निर्णय घेतला गेला. नबी मुंबईत झाड कोसळण्याची घटना घडल्यावर पालिकेकडून झाड जगवण्याऐवजी कोसळलेल्या झाडाचे तुकडे करून ते झाड बाजूला काढले जाते. मात्र असोसिएशनच्या सदस्यांनी मात्र झाडे जगवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिकेच्या अधिकारी चासकर यांनी झाडे तोडणारी माणसे उपलब्ध करून दिली. असोसिएशनने स्वखर्चाने क्रेन आणली. पसरलेल्या अवाढव्य झाडांच्या फांद्या तोडल्या गेल्या. त्या झाडांची खोडे व मुळे यांना कसलाही धक्का लागू न देता खड्डे खणून काळजीपूर्वक क्रेनच्या साहाय्याने पुररोपित केली गेली अनेक झाडांच्या उन्मळून पडण्याचे कारण त्या खाली असलेले खडकाळ भाग होते. अशा वृक्षांचे वेगळ्या भागात पुनररोपण केले गेले. सोसाट्याच्या वार्याने हे वृक्ष कोलमडू नये म्हणून जाडजूड रशीने हे वृक्ष इतर झाडांना अथवा लगतच्या भिंतींना बांधून आधार दिला गेला. 25 पेक्षा जास्त वृक्षांचे पुररोपण केले गेले. संस्थेचे अध्यक्ष जयंत ठाकूर, अमर्जीत सिंग, शेखर दरजी, दिलीप मुखी, त्रिवेदी व पिनाकल पटेल यांनी सलग दोन दिवस दिवसभर या उपक्रमासाठी मेहनत घेतली.