Breaking News

रायगडात 376 नवे रुग्ण; आठ जणांचा मृत्यू  

पनवेल : रायगड जिल्ह्यात 376 कोरोना रुग्णांची नोंद मंगळवारी (दि. 11) झाली असून, आठ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 291 रुग्ण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 179, ग्रामीण 26) तालुक्यात 205, अलिबाग 41, पेण 33, उरण 25, खालापूर 20, रोहा 12, माणगाव नऊ, कर्जत व महाड प्रत्येकी आठ, सुधागड सात, पोलादपूर तीन, मुरूड व म्हसळा प्रत्येकी दोन, श्रीवर्धन तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यात पाच, खालापूर, म्हसळा, पोलादपूर प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 19,298 आणि मृतांची संख्या 524 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 15,335 जणांनी कोरोनावर मात केली असल्याने 3439 विद्यमान रुग्ण आहेत. 

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply