Breaking News

राज्य सरकारने काढलेल्या स्थगन अध्यादेशाची होळी

कर्जत भाजपचे आंदोलन

कर्जत : प्रतिनिधी

केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या हिताचे मंजूर केलेले कृषी विधेयक बिल राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात लागू न केल्याने शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान होत आहे. कर्जत तालुका भाजपच्या वतीने तहसील कार्यालयासमोर राज्य सरकारचा जाहीर निषेध करुन  राज्य सरकारने काढलेल्या स्थगन अध्यादेशाची होळी करण्यात आली.

अध्यादेश रद्द करावा, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी तहसीलदारांकडे देण्यात आले. यावेळी भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, किसान मोर्चाचे कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे, प्रदेश सचिव अशोक गायकर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष परशुराम म्हसे, रमेश मुंढे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक बळवंत घुमरे, नगरसेविका स्वामिनी मांजरे, विशाखा जिनगरे, महिला तालुका अध्यक्षा स्नेहा गोगटे, लीना गांगल, शिवाजी पाटील, प्रकाश पालकर, मंदार मेहेंदळे, विजय जिनगरे, विनायक पवार, सचिन म्हसकर, वसंत महाडिक, मयुरेश शितोळे, विशाल कोकरे, सर्वेश गोगटे, सुजल गायकवाड, रुत्वीक आपटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply