Breaking News

वडिलांच्या संपत्तीत मुलीलाही मिळणार समान वाटा

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीलाही समान वाटा मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात मंगळवारी (दि. 11) ऐतिहासिक निर्णय दिला. त्यामुळे वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणे मुलीलाही हक्क असावा या मुद्द्यावरील वादावर आता पडदा पडला आहे.
1956मधील हिंदू वारसा हक्क कायद्यात 2005मध्ये सुधारणा करण्यात आली होती. आपल्या पित्याच्या मालमत्तेत मुलींना भावाप्रमाणे समान वाटा मिळेल, असे कायद्यात नमूद होते, परंतु 2005 पूर्वी वडिलांचे निधन झाले असेल त्यांना या कायद्याचा लाभ मिळेल की नाही हे स्पष्ट नव्हते. त्यामुळे या संदर्भात याचिका करण्यात आली होती. यावर मंगळवारी झालेल्या सुनावणीत हा कायदा प्रत्येक परिस्थितीत लागू होईल, असा निर्णय न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिला. वडिलांच्या संपत्तीचे वाटप होत असताना वडील हयात असतील किंवा निधन झाले असेल तरीही मुलीला मुलाप्रमाणेच समान वाटा मिळाला पाहिजे, असे खंडपीठाने या वेळी स्पष्ट केले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply