मुरूडमधील रामभक्तांच्या बैठकीत निर्णय
मुरुड : प्रतिनिधी
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण अभियान संदर्भात येथील हिंदू बोर्डींगमध्ये नुकताच मुरुड तालुक्याची व्यापक बैठक झाली. तालुक्यांतील 50हून अधीक गावांमधील श्री रामभक्तांनी सामाजिक अंतर राखत या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रायगड जिल्हा सहव्यवसाय प्रमुख संजय ठाकूर यांनी या बैठकीत श्री रामजन्मभूमीच्या संघर्ष लढ्याचा इतिहास सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण संदर्भात जनजागृती करण्यासाठी श्रीराम भक्तांनी मुरूड तालुक्यात जनजागरण अभियान राबविण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला.
यावेळी रा. स्व. संघाचे मुरूड तालुका संघचालक दिलीप जोशी, तालुका कार्यवाह समीर उपाध्ये, अभियान प्रमुख सुनिल विरकुड, सहप्रमुख रुपेश जामकर, महिला सहप्रमुख अस्मिता पेंडसे आदींसह श्री रामभक्त मोठ्या संख्यने उपस्थित होते.