नवी मुंबई : बातमीदार
लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती बिकट असताना ग्राहकांना अवाजवी बील देणार्या महावितरणच्या नवी मुंबईतील कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 11) तोडफोड केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी सेक्टर 17 मधील कार्यालयात घुसून प्रवेशद्वारावर खळ्ळ् खट्याक केले.
लॉकडाऊनच्या काळात महावितरणकडून नागरिकांना वाढीव बिले देण्यात आली आहेत. सर्व ग्राहकांना अंदाजे आणि सरासरी बिले आकारण्यात आली असून, याचदरम्यान महावितरणने वाढीव दराची अंमलबजावणी केल्यामुळे बिलातील रक्कम अधिकच फुगून गेली.
लॉकडाऊन काळात वाढीव बिले मागे घ्या, अन्यथा तर आंदोलन करू, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिला होता. त्यानुसार मनसेच्या विविध भागातील पदाधिकार्यांनी महावितरणच्या अधिकार्यांना भेटून वाढीव बिले मागे घेण्याची मागणी केली होती, मात्र या महिन्यात पुन्हा नागरिकांना वाढीव बिले आल्यामुळे मंगळवारी सकाळी नवी मुंबईतील मनसेच्या निवडक कार्यकर्त्यांनी वाशीतील महावितरणच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. या वेळी महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …