पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 11) कोरोनाचे 205 नवीन रुग्ण आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 173 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 179 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, चौघांचा मृत्यू झाला. 131 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 26 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला. 42 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
पनवेल आर. बी. कॉम्प्लेक्स, खांदा कॉलनी सेक्टर 9, कळंबोली सेक्टर 13 वात्सल्य सोसायटी आणि कामोठे सेक्टर 20 शिखर अपार्टमेंटमधील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 32 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या 1553 झाली. कामोठ्यात 35 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1785 झाली आहे. खारघरमध्ये 59 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या 1645 झाली.
नवीन पनवेलमध्ये 26 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या 1478, तर पनवेलमध्ये 18 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1466 झाली आहे. तळोजामध्ये नऊ नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 500 झाली. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 8427 रुग्ण झाले असून 6619 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.55 टक्के आहे. 1611 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 197 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन 26 रुग्ण आढळले आहेत. कोळखे येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 42 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नोंद झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये उलवे येथील नऊ, नारपोली, ओवळे, सुकापूर, करंजाडे येथील प्रत्येकी दोन तसेच चिपळे, डेरवली, कोळवाडी, कोपर-गव्हाण, न्हावा खाडी, साई, विचुंबे, वहाळ, वावेघर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2494 झाली असून 2101 जणांनी कोरोनावर मात केली असून 52 जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत 359 जण कोरोनामुक्त; रिकव्हरी रेट पोहचला 80 टक्क्यांवर
नवी मुंबई ः बातमीदार
नवी मुंबईत मंगळवारी 278 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, तर 359 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोनाबधितांची एकूण संख्या 19 हजार 33, तर बरे झालेल्यांची संख्या 15 हजार 173 झाली आहे. नवी मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून तो 80 टक्क्यांवर स्थिरावला असून नवी मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत तीन हजार 382 रुग्ण उपचार घेत आहेत. मंगळवारी सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 478 झाली आहे. मंगळवारी दिवसभरात दोन हजार 436 रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या असून, एकूण रॅपिड अँटीजेन टेस्टची संख्या 37 हजार 980 झाली आहे. एकूण आरटीपीसीएस टेस्ट केलेल्यांची संख्या 37 हजार 347 झाली असून कोविड टेस्ट केलेल्यांची एकूण संख्या 75 हजार 327 झाली आहे. नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 39, नेरूळ 57, वाशी 28, तुर्भे 13, कोपरखैरणे 30, घणसोली 42, ऐरोली 65, दिघा चार असे रुग्ण आढळले आहेत.
उरण तालुक्यात 25 कोरोना रुग्ण; 18 जणांना डिस्चार्ज
उरण ः प्रतिनिधी, वार्ताहर
उरण तालुक्यात मंगळवारी (दि. 11) 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 18 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये करंजा, जेएनपीटी प्रत्येकी तीन, तर जासई, कृष्णाई नगर चाणजे, डोंगरी, भोईर आळी नवीन शेवा, लक्ष्मी आळी उरण, दत्त मंदिरजवळ चिरनेर, द्रोणागिरी नोड उरण, पागोटे, ओएनजीसी कॉलनी, मिडक मार्ग दिघोडे, नागाव उरण, मोरा पोलीस स्टेशन मागे, धुतूम, द्रोणागिरी मंदिराच्या मागे करंजा, प्राइम प्लाझा बाली कॉर्नर करंजा रोड, गणपती मंदिर आवरे, सृष्टी कॉम्प्लेक्स केगाव, माणकेश्वर कॉलनी केगाव, अर्चना इन्फो करंजा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
बरे झालेल्या रुग्णांमध्ये नागाव आठ, जेएनपीटी, उरण प्रत्येकी चार, तर करंजा, बोरखार येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 1025 झाली आहे. त्यातील 845 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 140 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत 40 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याची महिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.
कर्जतमध्ये आठ जणांना लागण
कर्जत ः प्रतिनिधी
कर्जतमध्ये मंगळवारी आठ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे आठ जणांमध्ये सहा महिला आहेत. आतापर्यंत दररोज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये पुरुष रुग्णांची संख्या जास्त असायची. आजपर्यंत तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 611वर गेली असून, 520 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
बाजारपेठेमध्ये राहणार्या 37 वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच त्यांच्या 64 वर्षांच्या सासूबाईंनासुद्धा कोरोनाची लागण झाली असून त्यांचा हॉटेल व्यावसायिक असलेला पती नुकताच कोरोनावर मात करून घरी परतला आहे. कचेरी रोडवरील एका घरामध्ये राहणार्या एका 45 वर्षांच्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून ही व्यक्ती अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरीस आहे. मोठे वेणगाव येथील 58 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला आजारी असल्याने एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली असता तेथे तिची कोरोना टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
गौळवाडी-माळवाडी येथील 55 वर्षांच्या महिलेला कोरोनाची बाधा झाली. कर्जत बाजारपेठेतील 60 वर्षांच्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दहिवली इंदिरानगर येथील गणेश मंदिर परिसरात राहणार्या 58 वर्षांच्या महिलेला कोरोनाची लागण झाली. किरवली ज्ञानदीप सोसायटीत राहणार्या एका 40 वर्षांच्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.नातेवाइक भेटण्यासाठी आल्यास ठोस कारण असेल तरच प्रवेश द्यावा. क्वारंटाइन सेंटरमध्ये प्रत्येक गोष्टीची नोंद असावी. येणारे लोक, कर्मचारी ड्युटी चार्ट असावेत. सेंटरमध्ये महिला रुग्ण तळमजल्यावर असावेत, जेणेकरून तेथे कर्मचार्यांची वर्दळ असेल. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत क्वारंटाइन सेंटर आहे तेथे पीपीई किटसह पोलीस कर्मचारी असावेत. याशिवाय महिला सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना ताबडतोब कराव्यात. अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी एसओपी तयार करून तत्काळ अंमलबजावणी करावी. लवकरात लवकर डॅशबोर्डची व्यवस्था करावी, अशा विविध सूचनावजा मागण्या भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केल्या आहेत.
महाडमध्ये आठ नवे रुग्ण; एकाचा मृत्यू
महाड ः महाड तालुक्यात मंगळवारी (दि. 11) कोरोनाचे नव्याने आठ रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी महाडमध्ये 19 रुग्ण आढळले होते. आजच्या रुग्णांमध्ये शिरगाव, मिडास रेसी. प्रभात कॉलनी, महाड, प्रभात कॉलनी महाड, सिटी प्राइड प्रभात कॉलनी महाड, बिरवाडी, तेटघर येथील रुग्णांचा समावेश आहे. विठ्ठलवाडी तांबड भुवन महाड येथील 65 वर्षीय स्त्रीचा मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यात एकूण 117 रुग्ण उपचार घेत असून, 444 रुग्ण बरे झाले आहेत, तर 30 जणांचा मृत्यू झाला. महाड तालुक्यात आतापर्यंत 591 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
रोह्यात 12 कोरोनाबाधित रुग्ण
रोहे ः प्रतिनिधी
रोहा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागामध्ये मंगळवारी 12 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. त्यामुळे रोहा तालुक्याची कोरोना संख्या 835वर पोहचली आहे, तर एका दिवसात 24 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात करणार्यांची संख्या 562 एवढी झाली आहे. आतापर्यंत रोहा तालुक्यात 18 व्यक्तींना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. रोहा तालुक्यात आता 255 सक्रिय कोरोनाबाधित विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.