Breaking News

एमआयडीसी क्षेत्रात उद्योग मित्र कार्यालय उभारण्याची मागणी

खारघर : प्रतिनिधी

एमआयडीसी क्षेत्रात उद्योग मित्र कार्यालय उभारावी तरच नवे उद्योजक घडतील, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अभय भोर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली.

महाराष्ट्रात छोटे मोठ्या अंदाजे 295 एमआडीसी कार्यक्षेत्र आहेत. या भागातील उद्योजकांना जागे संदर्भात शासकीय योजना विजे संदर्भात आणि शासकीय परवानग्याची या केंद्रांमार्फत निश्चित मोठया प्रमाणात मदत होऊ शकेल. परंतु सध्याच्या घडीला जिल्ह्या पुरते उद्योग केंद्र असल्याने ग्रामीण भागातील तरुण तरुणी तालुक्यातील नागरिकांना यासाठी शहरी भागात यावे लागते ते अनेक जणांना शक्य होत नाही. अनेक नव उद्योजक चार्टर्ड अकाऊंटंट मार्फत बँकांमध्ये जातात आणि त्यांना विनाकारण अनाठायी खर्च करावा लागतो.

चार्टर अकाऊंटंट लोकांची यामुळे चांदी होते. पर्यायी उद्योजक होण्याची अनेक तरुण तरुणींची स्वप्न धुळीस मिळत आहेत. सरकारने अनेक योजना जरी उद्योगांसाठी जाहीर केलेल्या असल्या तरी त्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत केंद्राची संख्या वाढविणे गरजेचे आहे. उद्योगांना या केंद्रामार्फत व्यवसायास जागा भांडवल शासकीय योजना विजे संदर्भात माहिती  उद्योगांना लागणार्‍या शासकीय परवानग्या दिल्या जाव्यात उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मुंबईत, ठाणे, पनवेल  या भागात सुद्धा उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक उद्योग बंद अवस्थेमध्ये सुद्धा आहेत या बदलत्या काळानुसार त्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे.

जिल्हा उद्योग केंद्राने सध्या राज्यामध्ये असलेल्या आजारी उद्योगांची संख्या जाहीर करावी. या उद्योगांशी संपर्क साधून ते उद्योग पुर्नउभारणी करण्यास प्रयत्न करावयास हवे, अशी मागणी सुद्धा फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply