उरण : रामप्रहर वृत्त
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील बि.कॉम, एम.कॉम, बी. ए., बि.कॉम (अकाउंट अँड फायनान्स) वर्ष 2021 मध्ये उत्तीर्ण झालेल्या पदवीधर स्नातकांना मुंबई विद्यापीठाच्या निर्देशांनुसार पदवीप्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी इंद्रजित गुहा (ग्रुप जनरल मॅनेजर ओ. एन.जी.सी. प्लॅन्ट उरण) हे मुख्य अथिती होते. त्यांनी उपस्थित पदवीधरांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात कोकण ज्ञानपीठ संस्थेचे खजिनदार धाबीया सेठ, रमेश ठाकूर (सदस्य महाविद्यालय विकास समिती), प्राचार्य डॉ. बळीराम एन. गायकवाड, प्रा. के. ए. शामा, प्रा. व्हि. एस. इंदूलकर आदी उपस्थित होते.
या वेळी पाहुण्यांच्या हस्ते एकूण एम.कॉम-22, बि.ए.-45, बि.कॉम- 61 व बि.कॉम (अकाउन्ट अँड फायनान्स)43 विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करण्यात आली. या वेळी शैक्षणिक 2020-21 मध्ये गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्याना रोख रक्कम देऊन पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. हन्नत शेख यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय प्रा. डॉ. पराग कारूळकर तर आभार प्रा. डॉ. ए. आर. चव्हाण व्यक्त केले. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.