Breaking News

पनवेलमध्ये 183 नवे पॉझिटिव्ह

11 जणांचा मृत्यू      178 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 14) कोरोनाचे 183 नवीन रुग्ण आढळले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 178  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 130 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 122 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 53   नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 56 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात खारघर तीन, खांदा कॉलनी-तीन, कामोठे दोन, पनवेल, न्यू पनवेल, तळोजे येथील प्रत्येकी एक अशा 11 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 18, कामोठेमध्ये 29, खारघरमध्ये 19, नवीन पनवेलमध्ये 26, खांदा कॉलनीमध्ये सात, पनवेलमध्ये 18, तळोजामध्ये 13 नवीन रुग्ण आढळले आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 8903 रुग्ण झाले असून 7173 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.57% टक्के आहे. 1504 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 226 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये उलवे 13, करंजाडे नऊ, साई पाच, सुकापूर, कोळखे व पालीदेवद प्रत्येकी तीन, आकुर्ली, विचुंबे, आजीवली प्रत्येकी दोन, आदई, भोकरपाडा, डेरवली, दिघाटी, कराडे खुर्द, कोप्रोली, कुंडेवहाळ, पळस्पे, शिवकर, सोमटणे, वावंजे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत पॉझिटिव्हची संख्या 2651 झाली असून 2233 जणांनी कोरोनावर मात केली असून 54 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाडमध्ये 41 जण कोरोनाबाधित

महाड : प्रतिनिधी

महाड तालुक्यात शुक्रवारी नव्याने 41 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 12 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

आढळलेल्या रुग्णांमध्ये काकरतळे चार, नवेनगर तीन, सुर्या सो. तांबडभुवन, बिरवाडी, समी प्लाझा लक्ष्मी नगर बिरवाडी, लक्ष्मी रेसीडेन्सी, दुधानेअवाड बिरवाडी येथे प्रत्येकी दोन, दासगाव, प्रभात कॉलनी, केएसफ कॉलनी नांगलवाडी, राजमुद्रा अपा.उभामारुती काकरतळे, सुखकर्ता अपा.चवदारतळे, मारुती कॉ.दस्तुरीनाका, जुलीभवानी कॉलनी, मधलेअवाड, कोथुर्डे, नाते, काळीज, एक्वाफार्मा नांगलवाडी, विनती हौसिंग कॉलनी, भोराव, नांगलवाडी, वसतुशिल, ओम हौसि.नांगलवाडी, शिंदेआळी काकरतळे, राजेवाडी, डलनी हौसिंग, शिवनगर, कोळोसे, सेंटरप्लाझा, दहिवड येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तालुक्यात 168 रुग्ण उपचार घेत असुन, 477 जन बरे झाले आहेत. तालुक्यात एकूण 677 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

कर्जतमध्ये 18 नवीन पॉझिटिव्ह

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यात शुक्रवारी एका पोलीस शिपायासह 18 कोरोनाबाधित आढळले आहेत. आजपर्यंत कर्जत तालुक्यात 652 कोरोना रुग्ण सापडले असून 547 रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले आहेत. आढळलेल्या रुग्णांमध्ये कर्जत पाच, नेरळ तीन, तळवली दोन, अंजप, डिकसळ, देऊळवाडी, तिवरे, हुमगाव, मोठे वेणगाव, वावे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

उरण तालुक्यात 42 नवे कोरोना रुग्ण

एकाचा मृत्यू; 13 जणांना डिस्चार्ज

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील शुक्रवारी (दि.14) कोरोना पॉझिटिव्ह 42 रुग्ण आढळले, एक रुग्णाचा मृत्यू व 13 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आढळलेल्या रुग्णांमध्ये जेएनपीटी टाऊनशीप सहा, उरण चार, नागाव म्हातवली तीन, बोकडवीरा दोन, करंजा दोन, नागाव दोन, कांताळपाडा चिरनेर, जांभूळपाडा, धुतुम, केगाव, चिरनेर, उरण स्मशान भूमिजवळ, केगाव अवेडा, आवरे, द्रोणागिरी उरण, नागाव, केगाव, म्हातवली, ओंकार कॉलनी कुंभारवाडा, मुळेखंड तेलीपाडा, दिघोडे, मोरा कोळीवाडा, द्रोणागिरी बोकडवीरा, करंजा कासवलेपाडा, सीआयएसएफ कॉलनी, केगाव, बोरी, गोवठणे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये जेएनपीटी टाऊनशीप तीन, करंजा दोन, नागाव दोन, चिरनेर, जांभूळपाडा, धुतुम, केगाव, चिरनेर, उरण येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर गोवाठणे येथील एकाचा मृत्यू झाला आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1117 झाली आहे. त्यातील 876 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 192 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 49 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply