पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे होणार्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून, 21 बळींची नोंद शुक्रवारी (दि. 14) झाली, तर 446 नवे रुग्ण आढळले. दुसरीकडे दिवसभरात 362 रुग्ण बरे झाले आहेत. मयत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 11, कर्जत तीन, पेण दोन, उरण, खालापूर, अलिबाग, मुरूड व म्हसळा प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉॅझिटिव्ह रुग्ण पनवेल तालुक्यात 183, अलिबाग 49, उरण 42, महाड 41, खालापूर 36, पेण 25, माणगाव 20, कर्जत 18, श्रीवर्धन 13, रोहा 12, सुधागड तीन, मुरूड, तळा प्रत्येकी दोन असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 20,592 आणि मृतांची संख्या 592 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 16,542 जणांनी कोरोनावर मात केल्याने 3458 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
‘जनसेवेचे अमृतपर्व’ ग्रंथाचे लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात प्रकाशन
मोखाडा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper