Breaking News

दिवाळी साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग

पनवेल : वार्ताहर – दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वच सणांवर कोविडचे सावट आहे. यामुळे नागरिकांमध्येही काही प्रमाणात भीती आहे. भारतीय सणांमध्ये सर्वांत मोठ्या सणांपैकी एक असलेल्या दिवाळी सणावरही कोविडचे सावट आहे, मात्र सध्या अनलॉक सुरू झाल्याने बाजारपेठा सजण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीचे कंदील, पणत्या बाजारात विक्रीसाठी ठेवलेल्या दिसून येत असून, या वर्षी नागरिकांचा कल भारतीय बनावटीच्या वस्तू खरेदीकडे जास्त असल्याचे दिसून येत आहे.

भारतीय बाजारपेठेवर नेहमीच चीनच्या वस्तूंचा दबदबा असल्याचे पाहावयास मिळत आहे. आकर्षक आणि भारतीय वस्तूंच्या तुलनेत स्वस्त असल्याने या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत होते, मात्र या वर्षी चीनने सीमेवर केलेली कुरघोडी, स्वदेशी वापराबाबत

सुरू झालेल्या जनजागृतीमुळे नागरिकांचा कल स्वदेशीकडे वाढताना दिसत आहे.

पनवेलमधील बाजारपेेठांत स्वदेशी बनावटीच्या पणत्या, कंदील पाहावयास मिळत आहेत. 50 रुपये प्रतिडझन ते 300 रुपयांपर्यंत पणत्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पनवेलमधील युसूफ मेअर अली सेंटरमध्येही भारतीय बनावटीच्या पणत्या तयार करण्यात आल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे मॅजिक लॅम्प नामक विशिष्ट पणतीची मागणी या वर्षीही कायम असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे बच्चे कंपनीचा किल्ले स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विविध मावळे व इतर वस्तू खरेदी करण्याकडे कल दिसून आला आहे.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply