पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील दुकाने सुरू करण्यासंदर्भात केलेली मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल कापड व्यापारी असोसिएशन पनवेलने आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभारपत्र देऊन आभार व्यक्त केले आहेत.
कापड व्यापारी असोसिएशनचे राजकुमार सचदेव व मुकेश शहा यांनी आभारपत्रात म्हटले आहे की, आम्ही व्यापारीवर्ग आपणास धन्यवाद देतो. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावातून पनवेल शहर तसेच येथील नागरिक बाहेर आलेले दिसत आहेत. हे केवळ आपल्या मौल्यवान पाठिंब्यामुळेच शक्य झाले आहे.
मागील पाच महिन्यांपासून सरकारच्या सूचनेप्रमाणे पनवेल शहरातील नागरिक, व्यापारी हे लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करीत होते, परंतु आपला परिसर आता कोरोनामुक्त होताना दिसत आहे. पनवेल शहरातील जीवनशैली पुन्हा पूर्वीप्रमाणे होत आहे.
15 ऑगस्टपासून पनवेल शहरातील सर्व व्यवहार व दुकानांची वेळ पूर्वीसारखी केली आहे. हे केवळ आपण केलेल्या सहकार्यामुळेच शक्य झाले. असेच मजबूत पाठबळ आपणाकडून आम्हास भविष्यातही मिळेल, अशी अपेक्षा करीत आहोत. तरी कोरोनाबाबत योग्य ती काळजी आम्ही घेऊ याची पूर्ण हमी आम्ही देत आहोत, असेही व्यापारी असोसिएशनच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांना दिलेल्या आभारपत्रात नमूद करून आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
Check Also
खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …