अलिबाग ः प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. 16 टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांसाठी ही बंदी असेल. 18 ऑगस्टला रात्री 12 वाजल्यापासून 22 ऑगस्टपर्यंत, तसेच 28 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 29 ऑगस्टपर्यंत ही बंदी लागू असेल.
या कालावधीत रेती, वाळू किंवा त्यासारख्या गौण खनिजांच्या वाहतुकीलाही पूर्णपणे बंदी असणार आहे.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …