Breaking News

पनवेल एनएच 4 महामार्ग ते शिवकर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल एनएच 4 महामार्ग ते शिवकर रस्त्याच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरण कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई महानगर प्रदेश प्राधीकरण (एमएमआरडीए)च्या अतिरिक्त आयुक्तांकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल तालुक्यातील एनएच 4 महामार्ग ते शिवकर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, या परिसरातील ग्रामस्थांनी अनेक वेळा माझ्याकडे हा रस्ता तातडीने करण्याबाबत मागणी केली होती. याकरिता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल एनएच 4 हायवे ते शिवकर रस्ता एमएमआरडीएमार्फत करण्यासाठी मंजुरी दिली होती. मंजुरी मिळालेल्या या रस्त्याच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरण कामाच्या निविदा मागवण्यात येऊन बराच कालावधी होऊनदेखील अद्यापपर्यंत कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. सद्यस्थितीत रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहता तातडीने कामाला सुरुवात होणे अत्यंत गरजेचे आहे.
पनवेल एनएच 4 हायवे ते शिवकर रस्ता रुंदीकरण व काँक्रीटीकरण कामाचे कार्यादेश काढून या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आपणामार्फत तातडीने आदेश व्हावेत, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply