माथेरान : रामप्रहर वृत्तसेवा
येथील युवा रुखी गुजराती समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.16) बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. शिवसेनेच्या शिंदे गटाचे माथेरान शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून कोणत्याही प्रसंगी आम्ही आपल्या सोबत आहोत, असे आश्वासन दिले. माथेरानमधील वाल्मिकी नगर भागातील युवा रुखी गुजराती समाजाचे अध्यक्ष अंबालाल वाघेला, उपाध्यक्ष अशोक वाघेला, किसन वाघेला, विष्णू वाघेला, माजी अध्यक्ष नारायण पुरबिया, मनोज वाघेला, धीरज वालेंद्र, हृषीकेश वाघेला, उदयसिंग वाघेला, प्रवीण वाघेला, अजय वाघेला, नेहा पुरबिया, गीता वाघेला, मोनिका पुरबिया, गीता पुरबिया, कविता वाघेला यांनी त्यांच्या सहकार्यांसह रविवारी बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयुरेश कदम यांनी केले. पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन माजी नगरसेवक प्रकाश सुतार यांनी बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना केले. यावेळी संदीप शिंदे, गौरंग वाघेला, मयुरेश कदम, अनिकेत जाधव, खालिद शेख, दर्शन घाग, मयुरेश चौधरी, रियान मुजावर आदी उपस्थित होते. युवा सेनेचे निखिल शिंदे यांनी आभार मानले.