पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोशिश फाऊंडेशनच्या वतीने स्नॅपशॉटस फोटोग्राफी कॉम्पिटिशन 2021 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
कॅमेरा फोटोग्राफी व मोबाइल फोटोग्राफी अशा दोन स्वरुपात व खुल्या गटात तसेच पनवेल महापालिका हद्द मर्यादित ही स्पर्धा असून, प्रगतशील महिला, पाणी वाचवा, वन्यजीव, निसर्ग या चार विषयांवर आधारित आहे. स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 30 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहे.
फोटोग्राफ सादर करण्याची अंतिम तारीख 25 मार्च असून, सहभाग व अधिक माहितीसाठी 7757000000 या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper