पनवेल : बातमीदार
कोरोनाचा संसर्ग आणि गर्दी टाळण्यासाठी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संसर्ग टाळण्यासाठी घरगुती गणेशोत्सव करणारे आणि सार्वजनिक मंडळांनीही यंदा कमी उंचीच्या गणेश मूर्ती स्थापन करण्यास पसंती दिली आहे.
गणेशभक्त यंदा सहज विरघळणार्या शाडू मातीच्या आणि लहान मूर्तींचा आग्रह धरत असल्याची माहिती येथील मूर्तिकार यांनी दिली आहे. मातीच्या लहान मूर्तींची मागणी वाढली असली तरी एकूण गणेश मूर्तींच्या मागणीत मात्र यंदा घट झाल्याचे कुंभार यांनी सांगितले. तर यंदा कोरोनामुळे गणेशमूर्तींच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाल्याची माहिती दिली. अनेक मंडळांनी यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या मूर्तींना यंदा मागणीच नसल्याने त्यामुळे व्यवसायात मोठा तोटा झाल्याचेही त्यांनी सांगितले.