Breaking News

पळून गेलेल्या मुलीवर बलात्कार

पनवेल : बॉयफ्रेन्डसोबत पळून गेलेल्या 17 वर्षीय मुलीवर त्याच्या मित्रांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना खारघरमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,17 वर्षीय मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली होती. या मुलीला खारघरमधील फ्लॅटमध्ये नेले होते. तिथे तिला पावडर म्हणून ड्रग्ज देण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. सध्या तिचे समुपदेशन केले जात आहे. 15 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेची माहिती तिने याज्ञिका फॉउंडेशनच्या अनिता कारंडे यांना दिली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, तिघा आरोपींचा शोध घेत आहेत.

चिरनेर ग्रामपंचायतीचे आवाहन

चिरनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीनुसार चिरनेर ग्रामपंचायतीच्या वतीने घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवा संदर्भात मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आल्या. घरगुती गणेशोत्सवासाठी गणेशमुर्तींचे आगमन व विसर्जन मिरवणूकीच्या स्वरूपात नसावे, आगमनाच्या व विसर्जनाच्या वेळी जास्तीत-जास्त तीन-चार लोक असावेत. दर्शनासाठी तिर्थप्रसाद व महाप्रसादासाठी लोकांनी एकमेकांच्या घरी जाणे टाळावे. विसर्जनास्थळी नागरीकांना कमीत-कमी वेळ थांबता यावे, अशा सर्व नियमांचे पालन करून, सहकार्य करण्याचे आवाहन चिरनेर ग्रामपंचायत प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

पनवेलमध्ये खासगी रुग्णालयांची ‘तपासणी’

पनवेल : पनवेलमधील विविध खासगी रुग्णालयांची झाडाझडती केल्यानंतरही पनवेलमध्ये मोठ्याप्रमाणात चढ्या दराने वैद्यकीय शुल्क वसूल करण्याचे काम काही खासगी रुग्णालयांनी सुरू ठेवल्याने पनवेल पालिकेने तब्बल 25 रुग्णालयांची देयके तपासणी मोहीम हाती घेतली. यामध्ये खारघर येथील निरामय रुग्णालयाला पालिकेने तीन कंत्राटदारांचे दोन लाख रुपये परत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच विविध रुग्णालयांच्या व्यवस्थापनाने आरोग्य विभागाने घालून दिलेल्या अटीशर्तींचे उल्लंघन केल्याने त्यांनासुद्धा कारणे दाखवा नोटिसा देण्याचे काम पालिकेत युद्धपातळीवर सुरू आहे.

कांदा-बटाटा मार्केटच्या सुट्ट्यांमध्ये बदल

नवी मुंबई : नवी मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केट यापूढे वर्षांतून विविध सात दिवस बंद राहणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून कांदा, बटाटा व लसूण मार्केटमधील कामगारांना वर्षांतून 23 दिवस सुट्ट्या मिळत होत्या. त्या सुट्ट्या कमी करत अवघे सात दिवस या सुट्ट्या देण्यात येणार असल्याचे परपत्रजद्वारे जाहीर करण्यात आले आहे. 14 ऑगस्ट रोजी कांदा बटाटा आडत व्यापारी व महाराष्ट्र राज्य माथाडी जनरल कामगार युनियनच्या पदाधिकार्‍यांत बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे माथाडी व व्यापारी दोन्ही वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

सलमानच्या फार्महाऊसवर पोलीस बंदोबस्त

पनवेल : प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्या हत्येचा कट सराईत गुन्हेगार लॉरेन्स विश्वास या टोळीने रचला होता अशी माहिती पुढे आली आहे. फरीदाबाद पोलिसांनी या टोळीचा शार्प शूटर राहुल सांगा उर्फ बाबा सांगा याला अटक केली आहे. दरम्यान सलमान खान सध्या पनवेल तालुक्यातील फार्महाऊसवर राहत आहे. त्यामुळे या फार्महाऊसवर दोन बंदुकधारी पोलीस तैनात करण्यात आली असल्याची माहिती पनवेल पोलिसांनी दिली आहे.

Check Also

‘कहो ना… प्यार है’ला पंचवीस वर्ष झालीदेखील!

अगदी कालपरवाची गोष्ट वाटते. मनोरंजन उपग्रह वाहिन्यांवर अवघ्या काही सेकंदाच्या एका तजेलदार नवीन टीझरने आपलं …

Leave a Reply