Breaking News

कामोठ्यात अंडरग्राऊंड केबल कार्यान्वित

भाजप नगरसेवक विकास घरत यांचे प्रयत्न

कामोठे : रामप्रहर वृत्त – थोडासा पाऊस पडला किंवा वारा सुटला तरी देखील वीज गुल विजेच्या लपंडावामुळे कामोठ्यातीलरहिवासी त्रस्त झाले होते. या त्रासाचे मुख्य कारण म्हणजे जुनाट ओव्हर हेड केबल वायर हे लक्षात आल्यावर सोमवारी (दि. 24) प्रभाग क्र 13 चे भाजप नगरसेवक विकास घरत यांच्या हस्ते सेक्टर 34 येथील अंडरग्राउंड केबल पॅनल कार्यान्वित करून उद्घाटन करण्यात आले. यामुळे सेक्टर 34 मधील नागरिकांचा विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

या वेळी अचानक येणार्‍या वादळा मुळे व पावसामुळे वारंवार खंडित होणार्‍या विजेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरसेवक विकास घरत यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कामोठा परिसराचे विद्युत पुरवठा अंडरग्राउंड करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.

या उदघाटनाच्या वेळी सहाय्यक अभियंता गौतम सुर्यवंशी व लाईनमन संतोष कांबळे व प्रभागामधील अनेक रहिवासी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply