Breaking News

‘टाटा स्टील बीएसएल’मुळे रोजगार अन् पाणी

पनवेल : रामप्रहर वृत्त – टाटा स्टील बीएसएलने आपल्या महिला सक्षमीकरण आणि उद्यमशीलता प्रकल्पाद्वारे (विमेन एम्पॉवरमेंट अँड एंटर्प्रिन्युअरशिप प्रोजेक्ट) रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील आपल्या प्लांटजवळील दोन गावांना मदत पुरवली आहे. सध्याच्या गरजेच्या काळात टाटा स्टील बीएसएलच्या या प्रकल्पामार्फत गावांतील महिलांसाठी नवा रोजगार मार्ग निर्माण झाला आहे तर पाणलोट प्रकल्पामुळे स्थानिक गावकरी व मच्छीमारांना मदत मिळणार आहे.

स्टील उद्योगातील अग्रेसर कंपनी टाटा स्टील बीएसएलच्या सामाजिक कॉर्पोरेट दायित्व उपक्रमांतर्गत स्थानिक महिलांच्या सक्षमीकरणासाठी डब्ल्यूईई प्रकल्प सुरु करण्यात आला.  सुरुवातीला कोविड-19 काळात स्थानिकांना मदत म्हणून आणि महिला स्वयंसहायता गटांना सातत्यपूर्ण उत्पन्न स्रोत पुरवण्यासाठी डब्ल्यूईईअंतर्गत त्यांना फेस मास्क बनवण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.  पहिल्या टप्प्यात या गटांनी कंपनीला जे मास्क पुरवले त्यातून 1.9 लाख रुपयांचा एकत्रित नफा झाला.  खालापूर तालुक्यातील सावरोली आणि देवन्हावे ग्राम पंचायतीतील 4 स्वयंसहायता गटातील 43 महिला या कामात सहभागी आहेत.

या कामी तांत्रिक मदतीच्या दृष्टीने टाटा स्टील बीएसएलने वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (डब्ल्यूओटीआर) या स्वयंसेवी संस्थेसोबत भागीदारी केली असून त्या संस्थेच्या प्रीतिलता व विनय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.  या प्रकल्पासाठी स्थानिक स्वयंसहायता गटाच्या सदस्या लता संतोष पवार यांना महिला प्रवर्तक ही जबाबदारी देण्यात आली आहे.

डब्ल्यूओटीआरच्या मार्गदर्शनानुसार टाटा स्टील बीएसएलच्या सीएसआर विभागाने खालापूर तालुक्यातील देवन्हावे पंचायत क्षेत्रातील एका स्थानिक धरणाचे नूतनीकरण केले आहे.  यामुळे धरणाची क्षमता 30 लाख लिटरहून 67.04 लाख लिटर इतकी वाढली आहे. या धरण नूतनीकरणामुळे देवन्हावे परिसरातील पाच गावांतील तब्बल 1000 हुन जास्त गावकर्‍यांना फायदा होणार आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply