Breaking News

गणेश विसर्जनस्थळी भाजपतर्फे चोख व्यवस्था

उरण नगर परिषदेकडून सुविधा

उरण : वार्ताहर – आपल्या लाडक्या बाप्पांनी भक्तांनी सेवा केल्यानंतर दीड  दिवसांच्या गणपतींना रविवारी (दि.23) भावपूर्ण निरोप देण्यात आला. या वेळी उरण नगर परिषद नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विमला तलाव, भवरा तलाव, मोरा जेट्टी आदी ठिकाणी भक्तांना गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी त्रास होऊ नये चांगली व्यवस्था करण्यात आली होती.

विसर्जन ठिकाणी उरण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष माळी यांनी  गणपती विसर्जन  ठिकाणी भेट देऊन विसर्जन कसे चालले आहे त्याबद्दल माहिती घेतली. उरण शहरात उरण  नगरपरिषद हद्दीत सायंकाळी 4 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत गणपती गणपतींचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. त्यात उरण नगरपरिषद विमला तलाव येथे 247, भवरा तलाव येथे 55 व मोरा जेट्टी येथे 43 असे  हद्दीत सुमारे एकूण 345 गणेश मूर्ती विसर्जन करण्यात आले.

या उपक्रमांत उरण नगरपरिषदचे एकूण 32 कर्मचारी  कार्यरत होते. यावर्षी विमला तलाव येथे नोडल अधिकारी म्हणून जगदीश म्हात्रे यांनी काम पाहिले, अशी माहिती उरण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली. विमला तलाव येथे देऊळवाडी  युवक मंडळाचे सदस्यांनी गणपती बाप्पा विसर्जनासाठी मेहनत घेतली.

उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ठिक-ठिकाणी, तसेच विमला तलाव येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शांततामय वातारणात गणपती बाप्पांचे विसर्जन झाले. अतिशय शिस्तबद्ध, विसर्जन झाले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी सांगितले. डीसीपी अशोक दुधे यांनी गणपती बाप्पांचे ज्या ठिकाणी विसर्जन होत आहे. त्या ठिकाणी भेट देऊन पोलीस बंदोबस्तचा आढावा घेतला.

फिरता कृत्रिम तलाव आपल्या दारी

उपक्रमास नवी मुंबईत प्रतिसाद

नवी मुुंबई : बातमीदार – कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे या दृष्टीकोनातून मा. विरोधी पक्ष नेते व भाजप नेते दशरथ भगत यांच्या संकल्पनेतून व युवा नेते निशांत भगत यांच्या प्रत्यक्ष सहभागातून श्री गणेश मूर्तीचे विसर्जन अत्यंत सुलभ, जलद आणि सुरक्षित व्हावे याकरिता फिरता कृत्रिम तलाव आपल्या दारी या अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

रविवारी दीड दिवसाच्या सेक्टर 1, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि  10 या सेक्टर्स मधील प्रभाग क्र. 77 आणि 78 मधील दोन सोसायटयांमधील सार्वजनिक गणेश मूर्तीचे व नागरिकांच्या घरातील 1.5 दिवसाचे बाप्पाचे अशा एकूण 18 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

हायवा ट्रकमध्ये कृत्रिम रित्या बनवलेल्या तीन फूट खोल व 15 फूट लांब व आठ फूट रुंदीच्या अश्या रीतीने बनवण्यात आलेल्या फिरता कृत्रिम तलावाच्या माध्यमातून या पुढील पाच दिवसाच्या गौरी गणपती व 10 दिवसाच्या श्रींचे गणेश मूर्तीचे विसर्जन सदरच्या फिरता कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे.

वरील नमूद केलेल्या सानपाडा सेक्टर्समधील नागरिकांनी आपल्या सोसायटीच्या सेक्टर मुर्तीसह विसर्जनासाठी येण्याचे वेळ नोंदवण्यासाठी दोन्ही प्रभागात सेक्टर निहाय समनव्यकांची नावे व मोबाइल प्रभागात देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने नागरिकांनी या विसर्जन सेवेसाठी संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेविका स्थानिक वैजयंती भगत आणि रुपाली भगत केले आहेत. या अभिनव उपक्रमाबाबत नागरिकांनी दशरथ भगत, निशांत भगत व दोन्ही प्रभागाच्या सर्व नगरसेविकांचे आभार मानले आहे.

खांदा कॉलनीवासीयांना आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त – खांदा कॉलनी व आसपासच्या परिसरातील सर्व गणेशभक्तांना सुचित करण्यात येते की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमानुसार या वर्षी श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी पनवेल महानगरपालिका तर्फे कृत्रिम तलावांची तसेच सिडकोच्या वतीने मूर्ती ठेवण्यासाठी टेबलांची व्यवस्था करण्यात आली.

तसेच प्रशासनाकडून सेवेसाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व गणेश भक्तांनी विसर्जन आरती घरीच करून गर्दी टाळण्यासाठी फक्त दोन किंवा तीन व्यक्तीनींच विसर्जन ठिकाणी जावे. तसेच श्रींची मूर्ती उपस्थित कर्मचार्‍यांकडे द्यावी ते कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करतील. कृत्रिम तलावातील पाण्यात सोडीयम हायफोक्लोराईड मिसळले असल्याने मूर्तीचे निर्जंतुकीकरण होईल व तद्नंतर मूर्ती मुख्य तलावात विसर्जित करण्यात येतील सोसायटीने सोसायटीच्या आवारात कृत्रिम तलाव करून विसर्जन करावा, असे आवाहन भाजपचे पनवेल महानगरपालिकेच प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय दिनकर भोपी यांच्याकडून करण्यात आले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply