पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात बुधवारी
(दि. 26) कोरोनाचे 252 नवीन रुग्ण आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 209 रुग्णांनी कोरोनावर मात केली. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 190 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला, तर 175 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 62 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 34 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.पनवेल महापालिका हद्दीत पनवेलमध्ये प्रेस्टीज व्हीला, नंदनवन टॉवर, खांदा कॉलनी सेक्टर 9 अमरदीप सोसायटी, तळोजा येथील इनामपुरी, तळोजा सेक्टर 20 राज होम्स सोसायटी येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 29 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1876 झाली आहे. कामोठ्यात 50 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2304 झाली आहे. खारघरमध्ये 51 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या 2173 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 24 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1977 झाली आहे. पनवेलमध्ये 30 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1849 झाली. तळोजामध्ये सहा नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 592 आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 10,771 रुग्ण झाले असून 9458 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.81 टक्के आहे. 1042 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 271 जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये उलवे 12, नेरे व करंजाडे प्रत्येकी आठ, न्हावा सात, सुकापूर चार, आदई, विचुंबे, कोप्रोली, उसर्ली येथे प्रत्येकी दोन, बोर्ले, उसर्ली खुर्द, आकुर्ली, भगतवाडी-सुकापूर, भंगारपाडा-कुंडवहाळ, गव्हाण, कानपोली, केवाळे, कोळखे पेठ, कुंडेवहाळ, नितळस, पळस्पे, शिरढोण, शिवकर, वलप येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3223 झाली असून 2725 जणांनी कोरोनावर मात केली, तर 61 जणांचा मृत्यू झाला आहे.
महाडमध्ये 24 नवे रुग्ण
महाड : तालुक्यात बुधवारी कोरोनाचे 24 नवे रुग्ण आढळून आले आहे तर 25 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.आढळलेल्या रुग्णांमध्ये बिरवाडी चार, संजय ऑईल ट्रेडींग कंपनी दोन, महाड दोन, गुरुदत्त अपा.तांबडभुवन, कांबळे तर्फे बिरवाडी, शिवतिर्थ प्रभातकॉलनी, अभिषेक बिल्डींग जुना पोस्ट, देवकी अपा.नवेनगर, सुदर्शन कॉलनी, कोकरे तर्फे नात, सद्गुरू कृपा दस्तुरीनाका, पिंपळकोंड, रानवडी पडवी, नवेनगर, उषाप्रभा हॉस्पिटल नवेनगर, साईवत्सल्य बिल्डींग प्रभातकॉलनी, गणेश नगर वेरखोले, सँडॉझ कॉलनी, गुलमोहर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर बिरवाडी येथील 75 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. 156 रुग्ण उपचार घेत असुन, 696 रुग्ण बरे झाले आहेत तर 41 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 893 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
नवी मुंबईत 287 जण बाधित
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत बुधवारी 287 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 24 हजार 214 तर 278 जण कोरोनामुक्त झाल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या 20 हजार 314 झाली आहे. दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 557 झाली आहे.सद्य स्थितीत नवी मुंबईत तीन हजार 343 रुग्ण उपचार घेत आहेत. बुधवारी दिवसभरात एक हजार 546 रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून, एकूण रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या 71 हजार 668 झाली आहे. तर एकूण आरटीपी. सीआर टेस्ट केलेल्यांची संख्या 48 हजार 389 झाली असून कोविड टेस्ट केलेल्यांची एकूण संख्या एक लाख 20 हजार 057 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांची विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 26, नेरुळ 74 वाशी 37, तुर्भे 19, कोपरखैरणे 35, घणसोली 51, ऐरोली 44, दिघा एक अशी आहे.
कर्जतमध्ये 19 जणांना लागण
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात बुधवारी एका पोलीस शिपायासह 19 नवीन कोरोना बाधित आढळल्याने आतापर्यंत तालुक्याची एकुण बाधितांची संख्या 791 झाली आहे तर एकूण 665 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये म्हाडा कॉलनी तीन, पोलीस शिपाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या नजीक इमारत, नानामास्तर नगर, दहिवली, सावरगाव, बोरवाडी, वावळोली, आमराई, कडाव, पूनम गेस्ट हाऊस, नेरळमधील जुन्या बाजारपेठेत, ब्राह्मण आळी, दहिवली येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
उरण तालुक्यात 30 नवे पॉझिटिव्ह
उरण : उरण तालुक्यात बुधवारी कोरोनाचे नवे 30 रुग्ण आढळले, तीन रुग्णांचा मृत्यू व 12 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आढळलेल्या रुग्णांमध्ये चिरनेर, भेंडखळ, जेएनपीटी टाऊनशिप, वसंतविहार बुरुडआळी, सोनारी प्रत्येकी दोन, नागाव, करंजा कोंढरीपाडा, मांडळ आळी नागाव, चीर्ले, शांतीविहार कुंभारवाडा, जासई, नवीन शेवा, गोवठणे, कस्टम हाऊस, एमएसईबी कॉलनी बोकडवीरा, नेव्हल स्टेशन करंजा, केगाव, द्रोणागिरी, वाणीआळी, नागाव, केगाव अवेडा, मनोज फ्लोअर मिल बोकडवीरा, मोरा, बोरी, म्हातवली येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. एकूण रुग्णांची संख्या 1295 झाली आहे. 1062 बरे झाले आहे. 171 रुग्ण उपचार घेत असून 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.