पुणे : एकीकडे संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी भारतीयांना आनंदाची बातमी दिली. देशात सध्या कोरोनाच्या दोन लशी दिल्या जात आहेत. त्यात आता आणखी एका लशीची भर पडणार आहे. भारतात या तिसर्या कोरोना लशीचे ट्रायल सुरू झाले असून काही महिन्यांतच ही लसही सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमार्फत कोविशिल्डनंतर आता कोवोवॅक्स लस मिळणार असल्याची माहिती अदार पूनावाला यांनी ट्विटद्वारे दिली. पूनावाला यांच्या म्हणण्यानुसार कोवोव्हॅक्स लस आफ्रिकन व यूके वेरिएंटवरही परिणामकारक आहे. ही लस 89 टक्के प्रभावी आहे. लशीची भारतात क्लिनिकल ट्रायल सुरू झाली आहे. सप्टेंबरपर्यंत ही लस भारतात लाँच होण्याची आशा आहे.
Check Also
भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक
पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …