Breaking News

उसर्ली खुर्द, सांगडे, चिपळे येथे रस्ते कााँक्रिटीकरणाचे भूमिपूजन, उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यामातून पनवेल तालुक्यात अनेक विकासकामे करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीतून उसर्ली खुर्द येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 13) करण्यात आले. त्याचप्रमाणे सांगडे, चिपळे व उसर्ली खुर्द येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांचे उद्घाटनही भगत यांच्या हस्ते झाले.

या समारंभांना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पळस्पे जि. प. अध्यक्ष अनेश ढवळे, पं. स. अध्यक्ष अजय तेजे, युवा मोर्चा अध्यक्ष योगेश लहाने, कोनचे सरपंच निलेश म्हात्रे, पांडुरंग केणी, सुनील गवंडी, अप्पा भागित, घनश्याम पाटील, संतोष पाटील, विजय भगत, मच्छींद्र पाटील, गणेश भगत, प्रमोद भगत, संजय भगत, जयंवत भगत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply