Breaking News

पाणीचिंता मिटली!

मोरबे धरणात जून 2021 पर्यंत पुरेल एवढा जलसाठा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – गेल्या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात शंभर टक्के पाणीसाठा झालेल्या मोरबे धरणात या वर्षी ऑगस्ट महिना संपला तरी 82 टक्केच पाणीसाठा झाला आहे. हा साठा नवी मुंबईकरांना 7 जूनपर्यंत पुरेल इतका असल्याने पाणीचिंता मात्र मिटली आहे.

मोरबे धरणात गेल्या वर्षी 5251.20 मिलिमीटर  एवढया विक्रमी पावसाची नोंद  झाली होती. त्यामुळे धरणात मुबलक साठा झाला होता. 4 ऑगस्ट रोजीच धरण भरले होते. मागील तीन वर्षे धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला होता. या वर्षी पावसाने थोडी ओढ दिल्याने अद्याप धरणात 82 टक्केच साठा झाला आहे. जून व जुलैपेक्षा धरण परिसरात ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाला व आताही सुरू आहे. त्यामुळे धरण या वर्षीही भरण्याची शक्यता आहे. यासाठी 1100 मिमी.पावसाची आवश्यकता आहे.

पावसाला सुरुवात झाली तेव्हा धरणात फक्त 40 टक्के पाणीसाठा म्हणजेच 68.163 दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक होते. सद्य:स्थितीत धरणात 156.487 दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता 190.89 एवढी असून धरण 88 मीटर पातळीला पूर्ण भरते.

उपलब्ध साठ्यातून 7 जून 2021 पर्यंत शहराला पाणीपुरवठा करता येईल. असे असले तरी नागरिकांनी पाण्याचा जपूनच वापर करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर  यांनी केले आहे.

Check Also

डिस्टन्स इलेव्हनने पटकावले नमो चषक व्हॉलीबॉल विजेतेपद

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक …

Leave a Reply