पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक सेलच्या वतीने आयोजित संवादमालेत प्रसिद्ध अभिनेते तथा लेखक शरद पोंक्षे तिसरे पुष्प गुंफणार आहेत. त्यांच्याशी दिलखुलास गप्पांचा हा कार्यक्रम शनिवारी (दि. 23) सायंकाळी 6 वाजता पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात एबीपी वृत्तवाहिनीचे निवेदक दीपक पळसुळे हे शरद पोंक्षे यांची मुलाखत घेणार आहेत. या वेळी ‘मी आणि नथुराम’ या पुस्तकाच्या आठव्या आवृत्तीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. कोरोना नियमांचे पालन करून होणार्या या कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क असून या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी केले आहे.